हिंगणा तालुक्यातील अर्धवट विकासकामे त्वरित पूर्ण करा -माजी मंत्री रमेशचंद्र बंग… तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

शरद नागदेवे – नागपूर

हिंगणा तालुक्यातील अर्धवट असलेली विकास कामे त्वरित पूर्ण करा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी हिंगण्याचे तहसीलदार संतोष खांडरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले.

हिंगणा तालुक्क्यातील वेणा नदीवरील गुमगाव-डोंगरगाव मार्गांवर अर्थसंकल्पीय तरतुदी नुसार पुलाचे बांधकाम मंजूर असून ते अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे.

तेव्हा सदर पुलाचे रखडलेले काम सुरु करून लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच नागपूर -हिंगणा -हिंगणी राज्य महामार्ग क्र. २५५ या द्रुतगती मार्गाचे रुंदीकरणाचे काम कासव गतीने सुरु आहे.रस्त्यावर गिट्टी मुरुमाचे मोठं मोठे ढिगे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघातांची मालिका सुरु असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गती वाढवुन ते त्वरित पूर्ण करावे.

तर तालुक्यातील गुमगाव-सालईदाभा -बुटीबोरी या रस्त्याचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट स्तितीत असून वर्षभऱ्यापासून पूर्णतः बंद आहे त्यामुळे बुटीबोरी औधोगिक क्षेत्रास होणाऱ्या जड वाहतूकिस व कामगारांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे तेव्हा सादर मार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला जोडणारा गोंडखैरी -जबलपूर महामार्ग या जड वाहतुकीच्या रस्त्याचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून अर्धवट आहे तर जितके बांधकाम झाले होते काम सुद्धा पूर्ण खराब झाले आहे.

त्यामुळे हिंगणा व बुटीबोरी या एमआयडीसी ला होणाऱ्या वाहतूकिस अडथळा निर्माण होत आहे तसेच अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला जोडणारा हिंगणा ते गुमगाव ह्या चार किलोमीटरच्या राष्ट्रीय मार्गाचे बांधकाम मागील तीन वर्षा पासून अर्धवट आहे त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या हिंगणा आणि परिसरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटाना समोर जावे लागत आहे.त्यामुळे या दोन राष्ट्रीय मार्गांचे बांधकाम लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), महिला बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग, सुचिता विनोद ठाकरे राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र गोतमारे, पंचायत समिती सभापती बबनराव अवाले, उपसभापती सुषमा कवळे, खरेदी विक्री चे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, युवक तालुकाध्यक्ष आशिष पुंड.

कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंगारे, प.स. सदस्य आकाश रंगारी, सुनील बोदाडे राजेंद्र उईके, अनुसया सोनवणे, अंकिता ठाकरे, पौर्णिमा दीक्षित, गटनेते गुणवंता चामाटे,दिनेश ढेंगरे,विनोद ठाकरे, सुशील दीक्षित, प्रमोद फुलकर, प्रेमलाल चौधरी सुधाकर धामंदे, योगेश सातपुते, हनुमान दुधबळे, प्रशांत गव्हाळे,संजय नवघरे, अनिल क्षीरसागर, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here