आपत्तीजनक पोस्ट विरोधात पोलिसांत तक्रार…तरूणाने मागितली माफी.

राजु कापसे
रामटेक

रामटेक मधील एका पक्षाचा कार्यकर्ता(त्यांचे परिवारातील कुणाच्या भावना दुःखाऊ नए म्हणून त्यांचे नाव लिहिलेले नाही) नेहमी नेहरूजी सारख्या महापुरुषा विरुद्ध,आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी जी यांच्या विरुद्ध आपत्तिजनक लिहितो, गांधी परिवारा विरुद्ध ,कांग्रेस विरुद्ध खुप अपशब्द लिहितो.

आता त्याला धड़ा शिकविने गरजेचे होते. करिता आज सकाळी 09.00 वाजता पोलिस स्टेशन रामटेक येथे सर्व कांग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र येत ग़ैरअर्जदार यांचे विरुद्ध निवेदन देऊन मा.श्री. उदयसिंग उर्फ गज्जू यादव कांग्रेस नेते रामटेक विधानसभा क्षेत्र-59 यांनी रितसर तक्रार नोंदविली व याबाबत मा.ना.श्री सतेज उर्फ बंटी पाटील गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना अवगत केले.

मा. मंत्री महोदय यांनी तत्काल कांग्रेसजनांची भावना लक्षात घेता पोलीस अधीक्षक नागपुर(ग्रामीण) यांना तत्काल कड़क कारवाही करण्याचे निर्देश दिले. ततपूर्वीच थानेदार श्री प्रमोद मकेश्वर रामटेक यांनी तक्रारीची दखल घेत,तत्काल ग़ैरअर्जदार यास अटक करून चांगल्या प्रकारे प्रथामोपचार दिला.

तदनंतर त्या ग़ैरअर्जदार यांनी उदयसिंग यादव यांचेसह सर्व कांग्रेस पदाधिकारी यांची माफी मागितली. त्यावर श्री गज्जू यादव यांनी त्यास स्वर्गीय नेहरूजी यांनी काय अय्यासी केली व मा. सोनिया गांधीजी कोणत्या बार मधे बार बाला होत्या याबाबत प्रत्यक्ष प्रमाण दयावयास सांगितले.

त्याचप्रकारे सर्व कांग्रेसी यांना भड़वे म्हणून का संबोधिले, आणखी कुणाला फरक पड़त असो किंवा नसो पण कोणत्याही कांग्रेसीयांबद्दल अपशब्द वापरले तर,मला फरक पडणार, यानंतर कुणीही असे ग़ैरवर्तन केले तर गंभीर परिणाम होईल असा सज्जड दम दिला.यानंतर ग़ैरअर्जदार यांनी यानंतर अशी चूक करणार नसल्याची हमी दिली, पोलिसांनी ग़ैरअर्जदार यांचे विरुद्ध प्रतिबंध कारवाही करून प्रकरण शांत केले.

यावेळी श्री उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांचेसह श्री असलम शेख अध्यक्ष ना.जी कॉ(अल्पसंख्यक सेल),श्री पी.टी.रघुवंशी,श्री दामोधर धोपटे नगरसेवक श्री शंकर होलगिरे पंचायत समिती सदस्य, श्री प्रशांत कामडी सरपंच नगरधन, श्री रणवीर यादव,श्री बनवारी यादव श्री बालू बघेले,श्री भरत वाघमारे,श्री डॉक्टर रामसिंग सहारे,श्री सचिन खागर सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती रामटेक,श्री चंद्रकांत नंदनवार माजी उपसरपंच नगरधन,श्री राहुल कोठेकर अध्यक्ष रामटेक विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया विभाग,श्री मनोज नौकरकार, श्री मोहन भगत,श्री रोहित टाटी,श्री दुर्गेश नायडू,श्री सुशांत राले,श्री रुपेश जांभुळकर,श्री बबलू उर्फ विष्णू यादव,श्री नासिर शेख,श्री गुणवंत मडकवार,श्री संग्रामसिंग थूलकर श्री पवन मोहारे,श्री देवा वाडीभस्मे,श्री पवन गेडाम यांचेसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here