बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर, ओ,वाघ,यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या कडे ग्राम सेवकाची तक्रार…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर ,ओ, वाघ यांनी चिंचखेड ग्राम पंचायत तीचे ग्रामसेवक मंगोराव रामू साळुंके यांना तोंडी आदेश देत निलंबित केले,याबाबत ग्रामसेवक साळुंखे यांनी दि 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांच्या कडे तक्रार केली आहे,

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचखेड सिम ग्राम पंचायत तीचा नव्याने पदभार दि 26 जून 2020 रोजी घेतला असूनकार्यरत ग्रामसेवक ग्राम पंचायत तीच्या30जून रोजी झालेल्या मासिक सभेच्या ठरवाप्रमाणे गावात अनधिकृत पणे केलेल्या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या तसेच पुढील कार्यवाही चा अहवाल तहसीलदार यांना दिला,

याची सर्व जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असुन तहसीलदार 29 जुलै रोजी गटविकास अधिकारी आर ,ओ, वाघ यांना लेखी आदेश करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या, गटविकास अधिकारी। वाघ यांनी या आदेशाचा राग मनात धरत गावातील काही ग्राम पंचायत सदस्य, व ग्रामस्थांना हाताशी धरून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम सभा आयोजित करण्याचे सांगितले,ग्राम सभा घेण्याचा आग्रह धरला,

ग्राम सेवक श्री साळुंखे यांनीकार्यालयात आलेल्या ग्रामस्थांना सांगितले कि कोरोना रोगाचे माहामारीचे संकट असून ग्रामसभा आयोजित करता येणार नाही, तसे वरिष्ठां चेआदेश सुद्धा नाहीत,त्यावेळेस त्यावेळी काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक साळुंखेना धक्का बुक्की करतकाही वेळ ग्राम पंचायत कार्यालयात डांबून ठेवले होते,

हा संपुर्ण घडलेला प्रकार गटविकास अधिकारी श्री वाघ यांना सांगितला असता उलट गटविकास अधिकारी वाघ यांनी ग्रामसेवक मांगोराव साळुंखे यानांच तोंडी निलंबित करण्याचे आदेश काढला,यामुळे व्यथित होऊन ग्राम सेवक साळुंखे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे गटविकास अधिकारी आर ,व, वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली आहे,

बोदवड पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराबाबत एक नव्हे तर शेकडो तक्रारी दोन दोन वर्षपासून प्रलंबित आहेत, दलित वस्तीच्या कामाच्या तक्रारी,रोजगार हमी योजना च्या तक्रारी,कागदोपत्री झालेल्या कामाच्या तक्रारी,घरकुल च्या तक्रारी,ग्रामसेवकांनी लाभार्त्यांकडून नमुना नं 8 वर नावे लावण्यासाठी 8 ते 10 हजार रुपये घेतले आहे,

त्याबाबततक्रारी,स्वच्छ भारत मिशन च्या शौचालय बाबत च्या तक्रारी,अशा कितीतरी तक्रारी पडून आहेत, या तक्रारी गटविकास अधिकारी वाघ यांना माहिती नाही का?वरिष्ठांनी ग्राम सेवकाबाबत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यावर का कारवाई केली नाही,

संपुर्ण तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामावर बोगस मजुरांची हजेरी पट भरली जाते ,सर्व कामे ठेकेदारी पद्धतीने सुरू आहेत, या कामावरील कीती मजुरांची गटविकास अधिकारी आर ओ, वाघ यांनी चौकशी केली.

किंवा त्या कामावरील मजुरांसोबत सेल्फी काढली,भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकाना पाठीशी घालता,शिरसाळे येथील शौचालय याच्या कामाचे कार्यरंभ आदेश नसतांना काम करण्यात आले, हा गैर प्रकार दिसला नाही का?शासकीय वाहनाने फिरस्ती करतात,विकास कामांची पाहणी करतात,कागदोपत्री,जुन्या कामावर नवे काम दाखवले जाते हे.

दिसत नाही का?का फक्त कागदोपत्री फिरस्ती करतात,सेस फंडा तले कागदोपत्री कामे,दिसतं नाही,ज्या ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार, अधिकारारूपी वाघ नखांचा वापर भ्रष्टाचार पोखरु न काढण्यासाठी झाला पाहिजे असे जनतेतून बोलले जाते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here