पालघर तालुक्यातील कूड़ण ग्रामपंचायतच्या लेखापरीक्षण ची तक्रार जिल्हापरिषद मुख्याधिकारीच्या दालनात धुळ खात पडल्याने मुख्याधिकारी यांच्या बाबत स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित.

कुडण ग्रामपंचायती मधील प्रकार, गटविकास अधिकारी मार्फत चौकशीचे आदेश अडकले सुवर्ण मध्याच्या कचाटयात?

विनायक पवार- पालघर

पालघर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये दर वर्षी लेखापरीक्षण केले जाते. लेखा परीक्षणात ज्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात येतात त्या आक्षेपांची पूर्तता तीन महिन्याच्या आत करणे बंधनकारक असते. परंतु ह्या आक्षेपांची पूर्तता करण्यास अनेक ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार माहिती अधिकारात समोर येत आहेत.

असाच एक प्रकार कुडण ग्रामपंचायतीत झाल्याची बाब समोर आली आहे. कुडण ग्रामपंचायत यांचा सन 2014 पासून पाच वर्षे लेखापरीक्षणा दरम्यान नोंदविलेल्या आक्षेपांची पूर्तता झाली नसून या नियमबाह्य बाबीकडे गट विकास अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.

या प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या एक ग्रामस्थाला माहितीच्या अधिकारा अंतर्गत कागदपत्र देण्यास ग्रामपंचायतीने अनेकदा टाळटाळ केल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारा बाबत जिल्हा मुख्यकार्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर ह्या बाबत गट विकास अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरु करण्यात आली मात्र ती सुवर्ण मध्यात आडकली?.

ग्रामपंचायत अधिनियम नुसार लेखापरीक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पुर्तता तीन महिन्याच्या कालावधीत करण्याचे व त्या कार्य अहवालाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. असे असताना कुडण ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या अनेक नियमबाह्य बाबी तसेच आवश्यक पद्धतीने नोंदी नसलेल्या बाबतच्या आक्षेप वार्षिक लेखा अहवालात नोंदवण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे अपंग नोंदणी करणे, साहित्य खरेदी करणे, बांधकाम नोंदणी करणे, वृक्ष लागवडी संदर्भात अनेक आक्षेपांची लेखापरीक्षणात उल्लेखित असून त्याची पूर्तता झाली नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

महाराष्ट्र स्थानिक निधी लेखापरीक्षण अधिनियम १९३० मधील कलम ९ व महाराष्ट्र ग्रामपंचायत हिशेब तपासणी नियम १९६१ मधील १७ नुसार कायदाविरुद्ध करण्यात आलेले प्रदान,कोणत्याही व्यक्तीच्या अक्षम्य हयगयीमुळे किंवा गैरवर्तुणकीमुळे झालेल्या तुतीची किंवा नुकसान रक्कम व महत्वाच्या आदळून आलेल्या अनुचित व नियमबाह्य बाबी मुळे ग्रामपंचायत नियबाह्य काम करीत असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद आहे.

२०१८-१९ लेखापरीक्षणातील काही आक्षेप:
१) महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ प्रमाणे १ते ३३ नमुने अद्यावत न ठेवणे. त्यामुळे झालेला खर्च नियमानुसार झालेला नाही.
२) अर्थसंकल्पीय तरतूद व अधिक खर्च तसेच तरतुदीशिवाय खर्च करणे, तरतुदीपेक्षा ज्यादा खर्च केल्यास पंचायत समितीची मान्यता न घेणे.
३) वार्षिक लेखे जमा खर्च वर्गीकरण, नमुना ३ व ४ चा ताळमेळ व बँक पासबुक ताळमेळ ठेवणे आवश्यक असताना असे माहे जमा खर्चा प्रमाणे न करणे.
४) ग्रामपंचायतीने केलेल्या बांधकामाबाबत मोजमापे मोजमाप याची नोंद न करणे, उपअभियंता यांनी सर्व मोजमापे प्रमाणित केलेले नाहीत.
५) साहित्य खरेदीमध्ये अनियमितता निविदा व दरपत्रकाचा वापर न करणे, साहित्य खरेदी व सेवा पुरवठा शासनाद्वारे दरकरार केलेल्या वस्तु दरकरारानुसार खरेदी न करणे.
6) १४ व्या केंद्रीय वित्त आयोग प्राप्त अनुदानात केलेल्या खर्चाच्या लेख्यामध्ये अनियमितता नमुना २२ व २३ मध्ये केलेल्या कामाच्या नोंदी तसेच खरेदी साहित्याच्या नोंदी जडसंग्रह नोंदवहीत न घेता हिशोब नियम १९५९ नियम ५ नुसार रुपये ५०० च्या वरील रकमा धनादेशाने अदा करणे क्रमप्राप्त असताना बऱ्याच प्रमाणात त्या रोख स्वरूपात अदा केल्याचा आरोप चुरी यांच्या कडून करण्यात आला आहे. .

कोट :-
कुडण ग्रामपंचायत लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील आक्षेप पूर्तता बाबत चौकशी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात आल्या नंतर योग्य तो निर्णय वरिष्ठ कार्यालय घेईल.

चंद्रशेखर जगताप
गट विकास अधिकारी पालघर

कोट-
लेखापरीक्षण आक्षेपची पूर्तता ग्रामपंचायत अधिनियम नुसार मागील ५ वर्षापासून झाली नाही. अंतिम मंजूरी प्राप्त केलेले कागदपत्रे मागणी केलेली असताना अंतिम मंजुरी प्राप्त न झालेले आता पुर्ण करायला लावलेले कागदपत्रे माहिती अधिकारात देवुन दिशाभूल करणारी माहिती ३१/०३/२१ रोजी टपालाने प्राप्त झाली आहे.

तक्रारदार- कूड़ण
मिलिंद चुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here