मुर्तिजापूर | श्री.गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल…

नरेंद्र खवले ,मुर्तिजापूर – ता. १३ मुर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे यांच्याविरोधात मुर्तिजापूरशहर पोलिस स्टेशन येथे तक्रार श्री. गाडगेमहाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप शहाळे,प्रा डॉ राकेश बडगुजर,प्रा डॉक्टर सचिन माटोडे,प्रा डॉक्टर नितीन सातपुते प्राध्यापक अक्षय चव्हाण यांनी दाखल केली आहे.

मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे हे 22/11/2016 रोजी प्राचार्य या पदावर रुजू झाले. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रती असलेली वागणूक अत्यंत अशोभनीय आहे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अपमानास्पद बोलणे, एकेरी भाषेत बोलणे ,अश्लील शिवीगाळ करणे हा त्यांचा नित्य नियम आहे.

वारंवार नोकरीतून काढण्याच्या निलंबित करण्याच्या वेतनवाढ कपात करण्याच्या धमक्या ते नेहमीच देत असतात अशा या नेहमीच्या त्रासाला कंटाळून या सर्व प्राध्यापकांनी प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे यांच्याविरुद्ध माननीय कुलगुरू गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती यांना तक्रार दाखल केली.

त्या कारणाने ग्रंथपाल नितीन सातपुते यांना 11/11/2020 रोजी प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून अश्लील शिवीगाळ केले असा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. अशी तक्रार मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. ही सर्व माहिती श्री गाडगे महाराज महाविद्यालय प्राध्यापकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here