माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंगळे यांच्या विरोधात तक्रार…

बुलढाणा – राहुल गवई

सामाजिक न्याय, हक्कासाठी लढणारी सम्राट संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक, माजी सैनिक आशिष खरात यांचा जन माणसात चांगला रुतबा आहे.बुलढाणा शहरामध्ये हीरोळे पेट्रोल पंपासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा मिळावी या साठी आशिष खरात यांनी 30 मार्च रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण केले.

यावर नगराध्यक्षांनी लेखी आश्वासन देऊन आठ तारखेला विशेष बैठक बोलून चर्चा करून निर्णय घेऊ. असे आश्वासन देऊन उपोषणाची सांगता केली.बुलढाणा चे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले अशोक इंगळे यांनी आशिष खरात यांच्याबद्दल अशीष खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली.

असे वक्तव्य केले. त्यामुळे अशीष खरात यांनी अशोक इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे विरोधात बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली व तक्रारीत नमूद केले की, माझ्यावर पुतळा विटंबनेचा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही. तसेच पुतळा विटंबना संबंधित न्यायालयात कुठलेही प्रकरण दाखल नाही.

त्यामुळे समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशोक इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली व लवकरच अशोक इंगळे यांचे विरोधात मानहानीचा दावा दाखल करू असे आशिष खरात यांनी महाव्हॉइस प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here