आकोट, संजय आठवले
स्टोनक्रशरधारक संतोष शेंडे याने मौजे गाजीपूर येथिल आदीवासी शेतीच्या केलेल्या भाडेपट्ट्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी चौकशीचा आदेश दिला आहे. त्या आदेशान्वये ऊपविभागीय अधिकारी आकोट यानी ही चौकशी तहसिलदार आकोट यांचेकडे सोपविली आहे. ह्या चौकशी संदर्भात तक्रारदाराने आपले मुद्दे तहसिलदार आकोट यांचेकडे दिले असुन त्यानी त्या अनुषंगाने चौकशी करण्यास सहमती दर्शविली आहे.
या संदर्भात आकोट तहसिलदार निलेश मडके याना दिलेल्या निवेदनात तक्रारदाराने म्हटले आहे कि, मा. जिल्हाधिकारी अकोला व मा. ऊपविभागिय अधिकारी आकोट यानी मौजे गाजीपुर ता. आकोट येथिल आदीवासी शेत स. क्र. ३२/१ च्या संतोष रामकृष्ण शेंडे ह्याने केलेल्या भाडेपट्ट्यांची चौकशी आपणाकडे सोपविली आहे. ह्याप्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेण्यात यावेत.
१) चौकशीवेळी तक्रारदारास ऊपस्थित राहण्याची अनुमती द्यावी.
२) चौकशीसाठी तक्रारदाराचे बयान घ्यावे.
३) त्यांचेकडिल दस्त पुरावा म्हणून स्विकारण्यात यावेत.
४) दुय्यम निबंधक आकोट यांचेकडून दस्त क्र. ३१९१/२०१० दि. ०१.११.२०१० अन्वये सुनिल धूळे याने नोंदविलेल्या भाडेपट्ट्याची सत्यप्रत मागविण्यात यावी.
५) संतोष शेंडे विरुद्ध झालेल्या दि. २७/१०/२०२१ रोजीच्या एका तक्रारीसंदर्भात उपकार्यकारी अभियंता महावितरण आकोट याना चौकशी समितीने दि. ११.०१.२०२२ रोजी सादर केलेल्या ऊपकाअ/आकोट/ तांत्रिक/ १२३ दि. ११.०१.२०२२ ह्या अहवालाची सत्यप्रत त्यांचेकडून मागवून घ्यावी.
६)ऊपकार्यकारी अभियंता महावितरण आकोट यांचेकडून जुगना रावजी सावलकर ग्रा. क्र. ३२०३३०००००८६९ ची माहे एप्रिल २०२१ पूर्वीची तथा माहे एप्रिल २०२१ ते माहे डिसें. २०२१ या दरम्यानची आणि माहे जाने. २०२२ पासुन पूढील काळातील प्रत्येकी २/३ विद्युत देयके मागविण्यात यावीत.
७) मुद्रांक विक्रेता संजय जानराव बोरोडे, आकोट ह्याचेकडील मुद्रांक नोंदवहीतील दि. २८ मार्च २०१८ रोजीची मुद्रांक क्र. RW.091450 ची नोंद क्र. ७६५७ ही तपासण्यात यावी.
८) ह्या मुद्रांकाचा ऊपयोग कशासाठी केला गेला? आणि हा मुद्रांक सद्यस्थितीत कोठे आहे? त्याची पडताळणी व्हावी. ९) संतोष शेंडे अथवा जुगना सावलकर यांचे कडून हा मुद्रांक मागवावा.
या मुद्द्यांचे आधारे चौकशी केल्यानेच या प्रकरणातील सत्य उघडकिस येणार आहे. असे न झाल्यास होणारी चौकशी ही थातुरमातुर होणार आहे. त्यामुळे सत्य दडवून आकोट महसुल विभाग अपराध्यानाच पाठीशी घालीत असल्याचे सिद्ध होणार आहे. असे सिद्ध झाल्यास शासकिय कायदा, नियम, बंधने, अटी, शर्ती यांचा वचक नष्ट होऊन अपराधी प्रवृत्ती बोकाळण्याची शक्यता आहे. करिता वरिल विषयानुसार कार्यवाही व्हावी. अशी विनंती तक्रारदाराने केली आहे. या विनंतीवरुन आकोट ताहसिलदार निले श मडके यानी हे मुद्दे स्विकारले असुन त्या आनुषंगाने चौकशी करण्यास तयारी दर्शविली आहे.