अतिवृष्टी व बोगस बियाण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 20 हजाराची नुकसानभरपाई द्या…मनसेचे तहसीदारांना निवेदन

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी

अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले आहे तरी शासनाने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी वीस हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी असे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने अहमदपूर तहसीलदारांना दिले. महाबीज हे शासनाचे अधिकृत बियाणे आहे

आणि त्याला जर उत्पादनक्षमता नसतानाही बाजारात येण्यास परवानगी मिळत असेल तर हा संबंधित अधिकारी व तत्सम यंत्रणेचा दोष आहे.कृषिमंत्रालयाने(अवर सचिव) महाबीज च्या संचालक मंडळाला शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे आदेश दिले आहेत परंतु यामध्ये मौसम निघून गेला आहे.शेतकऱ्यांना दुबार,तिबार पेरणीसाठी पैसा शिल्लक नाही.त्यामुळे शासनाने बियाणे व तत्सम गोष्टी देतो म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता त्याचा सोयाबीन उत्पन्नाचा खर्च वगळता त्याला

जो फायदा एक एकर मध्ये लाभतो ते गृहीत धरून ही नुकसानभरपाई द्यावी.एक एकरमध्ये सोयाबीन बॅग ची किंमत 2500 रु.,पेरणी(600 रु)खत(dap)1200 रु.,फवारणी 1800 रु.बाकी खुरपनी(12 स्त्रिया/200रु एकूण 2500रु. ,दूनडे(1000रु/दोन वेळेस,रोजगारी, काढणी(3000 रु,मळनियंत्र(70रु.एका कट्ट्याला टोटल 2000रु.) आदी सर्व खर्चा अंदाचे 15 हजार रुपये येतो.त्यानंतर त्याला एक एकरमध्ये 9-10 क्विंटल सोयाबीन होते.त्याचा 3500-3800 भाव धरला तर अंदाजे 34-35 हजार रुपये एक एकर मध्ये पडतात.

आता त्यातून उत्पन्नखर्चा वगळला तर शेतकऱ्यांना एक एकर मध्ये अंदाजे 20,000 रु.फायदा मिळतो तो शासनाच्या बोगस बियाण्यांमुळे यंदा मिळणार नाही म्हणून शासनाने एकरी 20 हजाराची नुकसानभरपाई त्वरित जाहीर करावी व शेतकऱ्यांना आधार द्यावा.तसेच अतिवृष्टीमुळे व घरगुती बियाणे वापरण्या मुळे ही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अशीच नुकसानभरपाई द्यावी कारण अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती आहे तर घरगुती बियाणे वापरा हे शासनाने कृषिकार्यालायमार्फत सांगितले परंतु ते कसे वापरावे याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले नाही.त्यामुळे शेतकरी या मौसमात शासन व निसर्ग अश्या दुहेरी कचाटीत सापडला आहे.

तरी आपण त्वरित बोगस बियाणे, अतिवृष्टी व घरगुती बियाणेवापर अश्या विविध संकटांनी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्याना ताबडतोब मदत करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असेही निवेदनात सांगितले आहे.या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे,तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,तालुकप्रसिद्धिप्रमुखकृष्णा जाधव,माधव राठोड,मनवीसेचे जिल्हाप्रसिद्धीप्रमुख यश भिकाणे, अतिष गायकवाड,राघव जोंधळे आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


चौकट..मी गेल्या आठवड्यात कृषिमंत्रालय,मुंबई यांच्यासोबत लेखी व फोनवर्ती संपर्क साधत ह्या बोगस बियाण्याची तक्रार सर्वप्रथम केली तेव्हा तेथून मला महाबीज संचालक मंडळाला ‘बियाणे बदलून द्या’असे अवर सचिव मंत्रालय यांचे पत्र(23 जून) फॉरवर्ड केले गेले.परंतु जुलै आला तरी आतापर्यंत ही शेतकऱ्यांना बियाणे बदलून मिळाले नाही कारण महाबीज म्हणतय की कृषिकार्यालायमार्फत त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादीच मिळाली नाही.आणि या अक्षम्य दिरंगाईमुळे मौसम निघून गेला व जात आहेत म्हणून आम्ही नुकसानभरपाईची अतिशय व्यावहारिक अशी मागणी शासनाकडे केली आहे…डॉ नरसिंह भिकाणे, जिल्हाध्यक्ष मनसे लातूर.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here