अमरावती शहरात उद्यापासून संचारबंदीत शिथिलता…

न्यूज डेस्क – दिनांक १३.११.२०२१ रोजी अमरावती शहरामधे अचानक जमावाने हिंसक वळण घेउन व शहरामध्ये तोडफोड सुरु केली होती त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवुन जिवीन हानी होण्याची सकृत दर्शनी परिस्थिती निर्माण झालेली होती. अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता कलम-१४४ जाफौ.प्रमाणे संपुर्ण संचारबंदीचे (कर्फ्यू) आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.

अमरावती शहरामधील विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरावयाकरिता, आवागमन करण्यासाठी विद्यार्थ्यांना संचारबंदीमध्ये शिथिलता देणे आवश्यक असल्याने तसेच सार्वजनिक लोकांच्या हिताचे दृष्टीकोनातुन जिवनाश्यकवस्तु ,कृषी केंद्र व सरकारी कार्यालय यांना संचारबंदीमध्ये शिथिलता देणे आवश्यक असल्याने दिनांक १९.११.२०२१ रोजी जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाणे / बि – बियाणे व खताचे कृषी केंद्रे यांना सकाळी ०९.०० ते १२.०० वा. दुपारी १५.०० ते १८.०० वा. पर्यंत सुरु राहतील.

त्याचप्रमाणे, सर्व शासकीय कार्यालये ,बँका ही त्यांचे नियत वेळेनुसार सुरु राहतील. तसेच, परीक्षार्थी यांना परीक्षेकरीता व परीक्षेचा फॉर्म भरण्याकरीता विहीत ओळखपत्रासह संचारबंदीमध्ये सुट देण्याचे आदेश मा. डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती यांनी आदेश पारित केलेले आहे. अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन मा, डॉ.आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here