मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती तेलीपुरा या भागात राहणाऱ्या २८ वर्षीय युवकाने ५२ नं गेट जवळील रेल्वेरुळावरून जाऊन रात्री आत्महत्या केल्याची घटना सकाळीच उघडीस आली आहे. वैभव गुल्हाने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून आत्महत्या केल्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी वंदे मातरम् आपत्कालीन पथकाच्या टीम ला दिली. तसेच वंदे मातरम् आपत्कालीन पथकाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मृतक झालेला वैभव गुल्हाने वय २८ वर्ष राहणार जुनी वस्ती येथील रहिवासी होता. तसेच टीम ने मृतक वैभवला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे पी एम साठी आणण्यात आले.