पोलीस आयुक्त अमरावती शहर यांची देशमुख लॉन येथील नवीन पोलीस चौकीस भेट…

अमरावती – मागील काही दिवसा पासुन देशमुख लॉन परिसरात महिलांना एकटी बघुन गळयातील मंगळसुत्र चोरी व इतर चोरीच्या घटना घडत असल्याने या परिसरातील नागरीकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी व घटनांना आळा बसावा, यादृष्टीने मा. डॉ.आरती सिंह पोलीस आयुक्त, अमरावती यांनी देशमुख लॉन परिसरात तात्पुर्ती नवी पोलीस चौकी स्थापन केलेली आहे.

सदर पोलीस चौकीमध्ये पोलीस स्टेशन गाडगेनगर व पोलीस स्टेशन नांदगाव पेठ व पोलीस मुख्यालय येथील पोलीस अमलदारांची डयुटी नेमण्यात येत आहे. दिनांक ०६.१२.२०२१ रोजी संध्याकाळी १९.०० वा. अचानकपणे नवीन निर्माण करण्यात आलेल्या चौकीस भेट देवुन तेथील कर्तव्यावर उपस्थिीत असलेल्या पोलीस अमलदार यांना विचारपुस करून वेळोवेळी परिसरात पेट्रोलींग करणे बाबत सुचना देवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर व नांदगांव पेठ यांना आपआपल्या भागात सकाळी व सध्याकाळी जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुण प्रभावीपणे नाकाबंदी राबविण्याचे आदेशीत केले आहे.

पायदळ पेट्रोलींग दरम्यान रोडवरील पथदिवे बंद असल्याचे मा. पोलीस आयुक्त याचे निदर्शनास आल्याने अमरावती महानगरपालिका यांचे कड़े रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याबाबत तात्काळ पत्र व्यर करणेबाबत सुचना दिल्यात, मा पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी चैन स्नॅचिंगचे गुन्हे ज्या ठिकाणी घडलेले आहे अशा भागाला भेट दिल्यानंतर या भागात दिवसाची पायदळ पेट्रोलींग व राजगस्त प्रभावीपणे राबविण्याबाबत पोलीस निरीक्षक गाडगेनगर, नांदगाव पेठ व गुन्हे शाखा याना सुचना देवुन चैन स्नैचिंगये गुन्हयाना प्रतिबंध करणे व दाखल गुन्हे उघडकीस आणन्याबाबत चर्चा करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here