वॉट्सएप ग्रुपवरील पोस्टवर चिडवणारी कमेंट केल्यामुळे बापलेकांनी युवकाचा केला तलवारीने खुन…

शरद नागदेवे

नागपूर – अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत पाढंराबोळी ट्रस्ट ले-आऊट येथे राहणाऱ्या बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चाकू तलवारीने सपासप वार करून ठार केले.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक संतराम नहारकर (३८ रा.पाढंराबोळी,ट्रस्ट ले-आऊट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.मुन्ना महतो( ५०),रामू उर्फे चुन्नी महतो (२६) आणि चेतन महतो २४ असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.

चून्नी आणि चेतन दोघे एका वॉट्सएप ग्रुपमध्ये आहेत.दोन महिण्यापूर्वी अशोक नहारकर सुध्दा त्या वॉट्सएप ग्रूपशी जुडला. याग्रूपवर सामाजिक कार्याबाबत मेसेज येतात.चुन्नीने केलेल्या समाज कार्याचे फोटो आणि मेसेज त्या वॉट्सएप ग्रुपवर टाकले.त्यावर अशोकनी चिडवण्यासाठी कमेंट केले.त्यामुळे चुन्नी आणि चेतन चिडले.त्यांनी ग्रुपवरच अशोकला शिवीगाळ केली.तेव्हा दोघांनेही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती.

दोन दिवसांपूर्वी अशोक घरासमोर उभा होता.त्यावेळी चेतननी अशोकला शिवीगाळ केली.रविवारी १० च्या सुमारास अंगणात चून्नी तीथे आला.दोघांनी एकामेकाला रागाने पाहिले.रागाने पाहिल्यामुळे चिडलेल्या चुन्नीने लहान भाऊ चेतनला आवाज दिला.चेतन आणि वडील मुन्ना दोघेही पळतच अशोकच्या घरी आले.तिघांन सोबत अशोकची बाचाबाची झाली.

वाद वाढत गेल्यानंतर चेतन आणि मुन्नाने घरात घूसून अशोकचे दोन्ही हात पकडले तर चुन्नी याने तलवार अशोकच्या पोटात भोसकली नंतर तिघांनेही चाकू ,तलवारीने अशोक याचावर सपासप वार करीत ठार मारले.याप्रकरनी दिनेश नहारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.आबांझरी पोलीसांनी तासाभरात तिन्हीं आरोपीला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here