कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथे भारत सरकारच्या जल जीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचा सर्वे नुकताच सुरु करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत प्रत्येक घराघरात पाणी मिळाले पाहिजे.ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी विशेष योजना राबवली जाईल.
ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टॅन्क नाही तिथे नवीन टॅन्क बांधून नवीन पाईप लाईन घालने लोकसंख्येवर आधारित बोरवेल मारणे.पाण्याची टाकी नवीन बांधणे .प्रत्येक गल्लीमध्ये नळ योजना उपलब्ध करणे.
अशा प्रकारची कामे करण्यासाठी जीवन मिशन योजनेचा सर्वे सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कडून देण्यात आली. हणबरवाडी येथे सुरू असलेल्या सर्वेच्या वेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ अक्काताई संजय डुम, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र जाधव,
शिवलिंग दिवटे ,ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे पाच कर्मचारी जल जीवन मिशन योजनेचे 15 कर्मचारी हे सगळे सध्या सर्वे करण्याच्या कामात आहेत.येणाऱ्या भविष्य काळात प्रत्येक घरात पाणी पोहोचेल या उद्देशाने ही योजना होत असल्याने सुरु असलेल्या सर्वे बद्दल नागरिकांच्या तून समाधान व्यक्त केले जात आहे..