कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी…

“शक्तीच्या साधनेचे आणि भक्तीच्या ज्योतीची प्रचिती आजच्या दिवसाला येते” – सौ. राजकुमारी तेजेन्द्र्सिंग चौहान यांचे प्रतिपादन

दिनांक १२ जाने. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे आज रयतेचे राजा शिव छत्रपती राजे शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता मॉ जिजाऊ यांची जयंती आणि सोबतच युथ आयकॉन स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी लक्ष्मीनारायण ग्रुपच्या संचालिका सौ राजकुमारी तेजेन्द्र्सिंग चौहान या उपस्थित होत्या.

लक्ष्मीनारायण ग्रुपच्या संचालिका सौ राजकुमारी तेजेन्द्र्सिंग चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असतांना आज खऱ्या अर्थाने संपूर्ण देशातील मातृशक्तीला आणि समस्त युवकांना अनेकानेक शुभेच्छासह त्यांनी समाजाला आज सक्षम आईची आणि सुदृढ, बलदंड, सुस्वभावी तरुणाची गरज आहे असे नमुद करीत हे राष्ट्र तरुणाईचे आहे. त्यांच्या कुशलतेवरच आधुनिक राष्ट्राची उभारणी शक्य आहे. गतिमान युगात त्यांच्या प्रगतीचा आलेख उंच असावा, त्यांनी चरित्र संपन्न असावे. असा आग्रह सक्षम विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. गौरव माने सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन सौ. गणोरकर मॅडम यांनी केले. यावेळी मॉडेल स्कूल चे मुख्याधापक जाधव सर, प्रा. राठी मॅडम, प्रा. जावरे मॅडम, प्रा. पुदाके मॅडम, प्रा. पाटील मॅडम, प्रा. पाटील सर, प्रा, बटवे मॅडम, महाजन सर. पूजा परदेसी, रिता श्रीनाथ, पवार मॅडम यांच्या सह शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here