जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,सी.इ.ओ.व मनपा आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर…मास्क वापरण्या संदर्भात नागरिकांना केले आवाहन
अकोला – माझे कुटुंब माझी जबादारी या संकल्पने अंतर्गत शासन विविध स्तरावर उपाययोजना राबवित आहे. नागरिकांनी कोरोना विषाणू बाबत सतर्क राहून आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्याच उद्देशाने सर्वांनी मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा तसेच सोशल डिस्टँसिंग च्या नियमांचे पालन अवश्य करावे जेणे करून कोरोना विषाणू चा होणारा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येणार या उद्देशाने आज जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी अकोला शहरातील बाजारपेठ मधील नागरिकांना मास्क चे वापर नियमित करण्या करता आवाहन केले तसेच जे नागरिक मास्क चा वापर करीत नाही त्यांना दंड सुद्धा या वेळी देण्यात आला.
अकोला शहरातील नारीकांनी पेट्रोल पम्प, बाजारपेठ, शालेय पुस्तक खरेदी दुकान, किराणा मार्केट, व ऑटो मध्ये प्रवास करताना मास्क चा वापर रोज करण्या संदर्भात आवाहन सुद्धा या वेळी करण्यात आले,
या मोहिमेस आज अकोला शहरातील खुले नाट्य गृह जवळून सुरुवात करण्यात आली या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जि. श्रीधर, जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, यांच्या सह आरोग्य, मनपा व पोलीस विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्तीत होते,
या वेळी जिल्हाधिकारी यांनी मास्क चा वापर रोज करणाऱ्याचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन सुद्धा केले.जिल्हातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, सर्व पोलीस सेटशन, सर्व बाजारपेठ मधील नागरिकांनी दररोज मास्क चा वापर करावा व इतरांना सुद्धा मास्क च्या वापर बाबत सूचना द्याव्या अशे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.