जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांची कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला भेट…दिला अतिदक्षतेचा इशारा…

राहुल मेस्त्री

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याकारणाने देशात सर्वप्रथम कर्नाटक प्रशासनाने कर्नाटक व महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरती कोगनोळी तालुका निपाणी येथे covid-19 सीमा तपासणी नाका उभारला आहे. यामध्ये कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाचे rt-pcr टेस्ट निगेटिव असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही.

गेल्या दोन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू असून राज्यासह देशात कोरोणाचा पुन्हा एकदा हाहाकार माजत असल्याने बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंधक करण्यासाठी हालचाली वेगानं वाढवली आहेत. दिनांक 22 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.आणि येथील संबंधित वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला.

बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक असल्याकारणाने या ठिकाणी अधिकाऱ्यांना जादा तास काम करावे लागत होते.मात्र आता निवडणूक संपली असून निवडणुकीमध्ये अडकलेले सर्व अधिकारी covid-19 प्रतिबंधक प्रक्रियेमध्ये सामील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली .त्याचबरोबर प्रत्येक कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना आठ तासच काम करावे लागणार आहे.

कोरोना पासून सर्व जनतेचे संरक्षण व्हावे या दृष्टिकोनातून शासकीय नियमाप्रमाणे आम्ही काम करत असून जनतेनेही आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे. जनतेने या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला असून शासनाकडूनही सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे. कर्नाटक शासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात होत असून सर्व केंद्रावरती सुव्यवस्थितपणे लसीकरणाचे काम सुरु आहे.

तहसिलदार व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन तेथील ऑक्सीजन बेड व इतर वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही. याची चौकशी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर शहराप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामपंचायतींना आदेश काढून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावामध्ये ग्रामस्थांनी मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले‌ आहेत. यात्रा, लग्न समारंभ व इतर कोणतेही कौटुंबिक कार्यक्रम हे आजारापेक्षा श्रेष्ठ नाहीत.

या कोव्हिड कालावधीमध्ये असे सर्व कार्यक्रम पुढे ढकलून शासनाचे नियम पाळून शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांनी केले… यावेळी प्रांताधिकारी युकेश कुमार, निपाणी उपतहसीलदार प्रविण कारंडे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here