शेलूबाजार येथे जिल्हाधिकारी…जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट जिवनावश्यक वस्तु करीता नागरिक परेशान…

पवन राठी – वाशिम

शेलूबाजार : येथे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या ६५ वर्षीय रुग्णाची ३० वर्षीय मुलगी आज प्राप्त झालेल्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली तर उर्वरित ८ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला निगेटिव्ह निघालेल्या लोकांना घरी सोडून होम क्वारंटीन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव सिल करण्यात आले आहे.

आज दि.१६ रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी भेट देवून गावातील प्रवेशाच्या गल्या रस्ते सिल करण्याच्या सुचना ठाणेदारांना दिल्या सोबतच विनाकारण बाहेर पडणार्या लोकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या त्यानंतर गावातील सर्वच रस्ते सिल करण्यात आले.

काल ९ लोकांचे थ्रोब स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते पैकी ३० वर्षाची महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली उर्वरित रुग्ण निगेटिव्ह निघाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी संपुर्ण गाव सिल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्या संपुर्ण गावात संचारबंदी लागु केली आहे ठिक ठिकाणी रस्ते बंद केले आहे मोटार सायकल, चारचाकी, वाहनावर बंदी लावण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना पेरणीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टराची वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. शेलुबाजार येथील पुर्ण गांव बंद केल्यामुळे जिवनावश्यक वस्तु करीता नागरिक परेशान झाले आहे. लहान मुलाना दुध मिळत नाही, तसेच पावसाळ्यात नळाचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे अॅक्वा च्या पाण्याकरित व जिवनावश्यक वस्तु करीता शासनाने मुभा द्यावी अशी चर्चा गावात चालु आहे.

दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे भेट देवून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घरी जावून विचारपूस केली सोबतच कंन्टेमेंट झोनची सुध्दा पाहणी करुन कंटेन्मेट झोन मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांनी कशाप्रकारे काम केले. यांची जिल्हाधिकारी यांनी विचारना केली व थर्मल स्कॕनर व पल्सआॕक्समीटर मिटर द्वारे कशी तपासणी करतात ते प्रात्यक्षिक मा.साहेबांनी करुन घेतले.

व रेकार्डची पाहणी केली. यावेळी संदिप नप्ते आरोग्य सेवक याँनी जिल्हाधिकारी यांना व्यवस्थित कंटेन्मेट झोन ची संपूर्ण माहीती व प्रत्यशिक करुण दाखविलेप्राथमीक आरोग्य केंद्राच्या चमूला तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना स्वत:ची काळजी घेवून कंन्टेमेंट झोनमधील नागरिकांच्या तपासणी करावी अशा सुचना दिल्या.

तीन दिवसापासून शेलूबाजार बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांच्या समस्या बाबत संबधीतांना विचारणा केली. बॅकींग सेवा बंद असल्याने पिक कर्जाचे प्रकरणे प्रलंबित असतीलच यावर काय उपाय योजना करता येईल याबाबत उपस्थीत अधिकार्‍यासी चर्चा केली.

एकाच दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी भेटी दिल्यामुळे नागरिक अतिशय भयभित झाल्याचे दिसून आले दोन्ही अधिकार्‍यानी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिवाराला सुरक्षीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसारच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये अशा सुचना दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बगाडे, गटविकास अधिकारी पवार, ठाणेदार धनंजय जगदाळे, ए.पी.आय. तुषार जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाकाळ,

समुदाय वैद्यकीय अधीकारी, डॉ गजानन बोरकर, डॉ सचिन आडोळे, आरोग्य सेवक संदीप नप्ते,पत्रकार मोहन राऊत, पवन राठी पोलीस पाटील मदन जुंगाडे, मंडळ अधिकारी अनिल वाडेकर, तलाठी उल्हास पांडे,ग्रामसेवक मधुकर राऊत, कुंदन पांडे, गावंडे, आरोग्य कर्मचारी गजानन पवार , रतन करवते, तायडे, देविचंद राठोड, कीशोर पवार दिलीप धंदरे, श्रीमती सातपुते, आशावर्कर व अंगणवाडी सेविका ऊपस्थित होती. महाव्हाइस न्युज़ करीता पवन राठी वाशिम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here