बेल्ट आणि बुटांच्या पावत्या जमा करा ! अन्यथा…जिल्हा परिषद शाळा विशेष बातमी…

(फोटो -सौजन्य -गुगल)

अमोल साबळे

अकोला : विद्यार्थ्यांना मे पर्यंतची केलेल्या टाय, बेल्ट, बूट, माेजे यांच्या मूळ पावत्या जमा करण्यासाठी आता ३० मेपर्यंतची मुदत मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. यापूर्वी पावत्या जमा दाेन दिवसात जमा करण्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ मे राेजी दिला हाेता.

पावत्या जमा न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला हाेता. आता पावत्या जमा करण्याची मुदत वाढविल्याने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा खासगी शाळा, कॉन्व्हेटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. परिणामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये बहुता:श शासकीय कर्मचारी आपल्या पाल्यांना शिकवत नाहीत.

Also Read: आसाम-मेघालय राज्यात पुराचा कहर…

त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट, बूट माेजे वितरीत करण्यात आले.

यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमही जमा करण्यात आली. मात्र टाय , बेल्ट, बूट, माेजे यांच्या मूळ पावत्या जमा झाल्या नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) साहित्य खरेदीच्या पावत्या सादर करण्याचा आदेश जारी केला हाेता. मात्र दाेन दिवसात पावत्या सादर न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात येईल

आणि सर्वस्वी जबाबदारी आहे जबाबदारी ही गट शिक्षणाधिकाऱ्यांची राहिल, असेही आदेशात नमूदअसेही आदेशात नमूद करण्यात आले. मात्र टाळेबंदी-संचारबंदीमुळे पावत्या जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही मुदत आता ३० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here