ठाण्यात दरड कोसळली…एकाच परिवारातील पाच जण ठार…

न्यूज डेस्क – मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला असून कालची चेंबूर आणि विक्रोळी येथील घटना ताजी असताना आज ठाण्यात मोठी दुर्दौवी घटना घडली आहे. ठाण्याच्या कळवा पूर्व भागात घोलाईनगरात डोंगर परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे.

आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना आहे. ठाण्याचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू केले. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मुसळधार पाऊस सुरु असतंच दरड कोसळण्याची घटना घडली तेव्हा शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी यादव कुटुंब राहत होते. यादव कुटुंबातील सदस्य दरडीच्या ढिगाराखाली सापडले. यात 3 वर्षांच्या संध्या यादव आणि १० वर्षांच्या सिमरन यादव या चिमुरडीचा समावेश आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.

मृतांची नावे

  • प्रभू यादव : वय ४५ वर्षे
  • विधावतादेवी यादव : वय ४० वर्षे
  • रविकिशन यादव : वय १२ वर्षे
  • सिमरन यादव : वय १० वर्षे
  • संध्या यादव : वय ३ वर्षे

2 जणांना वाचवण्यात आले आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 5-6 जणांना कळवा शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. तर अजून 5-6 जण ढिगाराखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here