जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सहकार्य करा. शिक्षण सभापती भारती पाटील यांचे आवाहन…

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर :- जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी केले आहे.कास्ट्राईब जिप कर्मचारी संघटना व शिक्षक संघटना यांच्या पदाधिकारीसोबत चर्चा करताना त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, मुख्य संघटन सचिव परशुराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, प्रसेंनजीत गायकवाड, राजू नवनागे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यांची बिंदू नामावली अद्यावत करणे, त्यानंतर पदोन्नती करणे, निर्बंध उठल्यानंतर पद भरती करणे,प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणे, प्रलंबित सेवानिवृत्तीची प्रकरणे निकाली काढणे, भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होणाऱ्या हप्त्यामध्ये अनियमितता असून ते नियमित करणे,

विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती करणे, १५ व्या वित्त आयोगानुसार ग्राम पंचायतीला मिळणारा निधी शाळेच्या विकासासाठी खर्च करणे, प्राथमिक शाळांना वीज बिल व आवश्यक बाबीसाठी सादील अनुदान उपलब्ध करून देणे, निरोगी राहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी करणे, विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणे, वित्त समितीचे सभापती म्हणून शिक्षण विभागासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिक्षण सभापती भारती पाटील यांनी सांगितले की,या सर्व मुद्द्यावर मी स्वतः लक्ष घालणार असून लवकरच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे सोबत संघटनेच्या पदाधकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी शिक्षण सभापती यांना संघटनेतर्फे भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here