सांगली जिल्ह्यात टांजानियातील तरुणाकडून १० लाख ९० हजार रुपये किमतीचे कोकेन…

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती…

सांगली – ज्योती मोरे

एकशे नऊ ग्रॅम कोकेन जवळ बाळगल्याप्रकरणी टांजानियातील एका इसमास सांगली पोलिसांनी अटक केलीय.माकेटोजॉन झाकीया असं या इसमाचं नांव असून त्याच्याकडून दहा लाख नव्वद हजार रुपयांचं कोकेन आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आलेयत.

पुणे बेंगलोर महामार्ग क्रमांक चार वर एका खाजगी ट्रॅव्हल्स ने सदर इसम प्रवास करत होता याबाबत खबऱ्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे,

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम

पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खाडे आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीयुत सिद, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, पोलीस निरीक्षक माने,याच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. सदर कोकेन कॅप्सूलमध्ये लपवून ठेवलेले होते आणि त्या गोळ्या एका मॉइश्चूरायझर च्या डबीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here