पातुर तालुका कृषी कार्यालयात पकडला कोब्रा नाग…

पातूर तालुका प्रतिनिधी
शिर्ला तालुका फळ रोपवाटिकेमध्ये असलेल्या तालुका कृषी कार्यालयाच्या बाजूला सर्पतज्ञ स्वप्निल सुरवाडे आणि संजय बंड यांनी कोब्रा नाग पकडला त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.


तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी नागांचा वावर आहे त्यामुळे येथे सापाची भीती कायम अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतावत असते. गतवर्षी एकदा तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनातच दोन सापांनी ठाण मांडले होते

त्यामुळे अधिकाऱ्यांना तासंतास खुर्चीत पाय वर करून ताटकळत बसावं लागलं त्यामुळे तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी सर्पतज्ञ स्वप्निल सुरवाडे आणि संजय बंड यांना निमंत्रित केले त्यांनी या परिसरात फिरून कोब्रा नागाला पकडले त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here