विशाल जबडे यांचा नागरी सत्कार…

राहुल मेस्त्री – जत्राट ता.निपाणी येथील विशाल जबडे यांची निपाणी ग्रामीण भाग भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा हंचिनाळ ता.निपाणी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आर एल चौगुले होते. तर प्रमुख पाहुणे एम.वाय. हवालदार होते.त्याचबरोब येथील भाजपा प्रमुख बबन हवलदारही उपस्थित होते.
हंचिनाळ येथील हनुमान मंदिरामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरवातीला केशव पाटील यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविक सुधाकर पवार यांनी केले.

पुढे श्री जबडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याठिकाणी सत्कार मूर्तीची प्रशंसा करणारी भाषणे श्री मारुती हवालदार,आर एल चौगुले,विकास नलवडे,गणेश कोंडेकर,अमोल पाटील (जत्राट )आदींनी केली.

याप्रसंगी एम एस वंदूरे, हरी पाटील, सिद्धार्थ कोंडेकर, शरद चौगुले ,सुमित वंदुरे,राहुल मजगे,भरत चौगुले, नीलकंठ चौगुले,ऋषी पाटील,तुळशीदास नलवडे, दिपक माळी, यांच्यासह भाजपा आणि स्पार्टन ग्रुप सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here