शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परत केला हरविलेला महागडा मोबाईल…

।।सातत्याने देत आहेत प्रामाणिकतेचा परिचय।।
मागील एक वर्षा पासून अकोला शहरात निर्माणधीन प्रमुख रस्ते व उड्डाणपूल ह्या मुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते, गजबजलेल्या चौकात सतत हजर राहून ऊन, वारा, पाऊस ह्याची पर्वा न करता आपले कर्त्यव्य सतत बजवावे लागते,

अकोला हे महाराष्ट्रातील पहिल्या पाच प्रदूषित शहरात मोडत असतानाच वाहतूक पोलीस अश्या प्रदूषणात आपली सेवा बजावत असतो, सेवा बजावत असतांनाच शहर वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवून बरीच सामाजिक कामे सुद्धा केली आहेत, मग ती भुकेल्या गरीब व्यक्तीला अन्न पाणी देणे

असो की गरजू लोकांना मास्क वाटणे असो की जेष्ठ व वृद्ध नागरिकांना वर्दळीचा रस्ता ओलांडण्यास मदत करणे असो किंवा चौकात किंवा रस्त्यावर हरविलेले एखादे पाकीट, पर्स, मोबाईल किंवा महत्वाची कागदपत्रे असो, शहर वाहतूक पोलीस अगदी पुढे असतो, म्हणूनच की काय साध्य एखाद्या नागरिकांचे काही महत्वाची वस्तू रस्त्यावर हरविली की ते हमखास चौकातील वाहतूक पोलिसांकडे चौकशी करतांना दिसत आहेत, असाच प्रसंग

आज दिनांक 9।3।21 रोजी स्थानिक अशोक वाटिका चौकात घडला, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार भास्कर दामोदर व गुलाम मुस्तफा रशीद खान हे आपले कर्त्यव्य पार पाडीत असतांना त्यांना चौकात सॅमसंग कंपनीचा एक महागडा मोबाईल पडलेला दिसला त्यांनी पाहिले असता तो लॉक केलेला दिसला

ते आजूबाजूला चौकशी करीत असतानाच त्या मोबाईल वर फोन आला व फोन कर्त्याने त्याचे नाव अमित बन्सल राहणार आर डी जी महाविद्यालय जवळ सांगुन तो त्यांचा मोबाईल असल्याचे सांगितले, वाहतूक पोलिसांनी त्यांना अशोक वाटिका चौकात मोबाईल चे बिलासह बोलावून खात्री करून त्यांचा

मोबाईल त्यांना परत केला, अमित बन्सल ह्यांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, वाहतूक पोलीस दामोदर आणि मुस्तफा ह्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व सर्व पोलीस कर्मचारी ह्यांनी त्यांचे कौतुक केले आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here