मास्क न घालता सवारी घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकां विरुद्ध शहर वाहतूकशाखेची धडक कारवाई…

एकाच दिवसात 200 चे वर ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई, नो मास्क नो सवारीह्या मोहिमेची गृहमंत्र्यांनी सुद्धा घेतली दखल.

डेस्क न्युज – अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी “नो मास्क नो सवारी” ही मोहीम सुरू केली.

असून त्या अंतर्गत दोन दिवस ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वतः मास्क घालण्याचे व ऑटोतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करून मास्क न घालणाऱ्या सवारी साठी ऑटो उपलब्ध न करून देण्याचे आवाहन व निर्देश दिले होते,

त्या नंतर चे दोन दिवस शहरात धावणाऱ्या ऑटोवर नो मास्क नो सवारी , ” माझे कुटुंब माझी जबाबदारी” , असे लिहलेले पोस्टर्स लावण्यात आल्यावर आज स्वतः पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या कर्मचार्यांसह रस्त्यावर उतरून नो मास्क नो सवारी चे निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर धडक कारवाया सुरू केल्या,

एकाच वेळी गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक ह्या गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच ऑटो चालकांची तारांबळ उडाली, ऑटो चालक स्वतः मास्क घालून ऑटोत बसलेल्या प्रवाश्यांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करतांना दिसत होते,

तरी सुद्धा दिवसभरात तब्बल 200 चे वर मास्क न घालणाऱ्या किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी कारवाई दररोज सुरू राहणार असल्याने ऑटो चालकांनी स्वतः हुन नो मास्क नो सवारी ह्या मोहिमेत सामील होऊन करोना पासून बचाव करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here