लसीकरण मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा नगरसेविका सौ प्रतिक्षा मोहन वसुकार यांचे आवाहन…

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या वतीने मुर्तीजापुर शहरांमध्ये 100% लसीकरण व्हावे म्हणून मुर्तीजापुर शहराचा प्रभाग क्रमांक एक मध्ये दिनांक 22 नोव्हेंबर रोजी एकता नगर मूर्तिजापूर येथे लसीकरण मोहीम कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा सभापती महिला व बालकल्याण समिती सौ प्रतीक्षा मोहन वसूकार व समाजसेवक मोहन वसूकार यांनी केले.

तसेच हे लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता नगर परिषद मूर्तिजापूर मुख्य अधिकारी विजय लोहकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषद कर्मचारी शकील सर तसेच चावरे व सय्यद सोहेल सुनंदा डोंगरे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉक्टर भोसले सर शितोळे मॅडम किशोर भाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

या लसीकरण मोहिमेमध्ये एकूण १७० नागरिकांनी लसीकरण मोहीमेचा लाभ घेतला आहे ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर चे मा. शहराध्यक्ष मोहन वसुकार व एकता नगर येथील नागरिकांनी लसीकरण मोहीम ला मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here