शिर्ला येथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून सतत ९ दिवसापासून वंचित…

निशांत गवई

शिर्ला येथील गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून तब्बल 9 दिवसापासून वंचित आहेत पावसाळ्याच्या दिवसात 1 किलो मिटर वरून आणत आहेत पाणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीमुळे सतत 9 दिवस होऊनही अजूनही पाणी नळाला नाही ग्रामपंचायत द्वारे लाखो रुपये खर्च करून ही आणि पुरेसे कर्मचारी असूनही पाणी मिळत नाही सतत पाण्यातील मोटार बिघडतात आणि त्यावर खर्च करायला निधी नाही काय?

गावकरी कडून दरमहा रक्कम वसुली करूनही जर पाणी मिळत नाही तर काय करावे एकीकडे पाणीदार शिर्ला म्हणत फक्त कागदावरच पाणीदार दिसते शासकीय नळ योजना पाण्याची टाकी गेल्या 20 वर्षापासून पडून आहे त्याच उपयोग शोभेची वस्तू बनलेली आहे.

दलित वस्ती मधील सामाजिक सभागृहाजवळील हॅन्ड पंपाची दुरावस्था झालेली आहे त्यात न खराब पाणी येत आहे , पाणी फाऊंडेशन प्रकल्प राबवून कोटी रुपये खर्च करूनही त्याच गावात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही शोकांतिका आहे.

गावात अश्या ग्रामपंचायत च्या हलगर्जीमुळे दूषित पाण्याच्या मुळे गावकर्यांना गॅस्ट्रो टायफाईड कॉलरा अतिसारांच्या रोगाचा सामना नक्की करावा लागेल कोरोनाच्या काळात सर्दी खोकला असे आजार डोकेदुखी ठरतील त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने त्वरित ग्रामपंचायत आदेशित करून वरील समस्यांचा निपटारा करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

शिर्ला येथे पिण्याच्या पाण्यापासून नागरिक 8 दिवसापासून हैराण पाणी असूनही पाणी नाही ग्रामपंचायत मार्फत पाणी पुर वठा चालू पण 8 दिवसापासून नागरिक पिण्याच्या पानापासून वंचित ग्राम पंचायत सोबत संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे मिळतात पाण्यासाठी वारंवार मासिक वर्गणी देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जी पणा आणि पावसाळ्यात दूषित पाणी हापशी द्वारे मिळत आहे.

पाणीपुरवठा विहीर वरील मोटार जडल्या मुडे गावातील पाणीपुरवठा बंद होत मोटार दुरुस्ती साठी पितांबरवाडी येथे टाकली होती आणि आज सकाळी दुरुस्ती होऊन मोटरपंप विहिरीत टाकली आहे तरी उद्या पासून पाणीपुरवठा नियमित सुरू राहील रिना संजय शिरसाठ सरपंच शीर्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here