मोबाईल टॉर्च च्या उजेडात शोधावा लागतो नागरीकांना रस्ता,गडमंदीर रस्त्यावरील पथदिवे बंद…

काळोखात जिव मुठीत घेवुन करावी लागते रहदारी. जंगली भागात काळोखाची भर.

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील उंच पहाडीवर असलेल्या श्रीरामगडमंदिराकडे जाणाऱ्या रस्तामार्गावरील पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासुन बंद असल्याने स्थानिक नागरीकांना कमालीचा त्रास होत आहे. पहाटे तथा सायंकाळच्या सुमारास पायदळ फिरायला ( मार्नींग तथा इव्हीनिंग वॉक ) जाणाऱ्या व तसेच गडमंदीर परिसरात दुकाने असलेल्या गाववस्तीतील नागरिकांना भर अंधारात जिव मुठीत घेवुन रहदारी करावी लागत आहे.

तेव्हा ते मोबाईल टॉर्च च्या उजेडात आपली वाट शोधत असल्याची सध्याची वास्तव परीस्थिती आहे.रामटेक येथील श्रीरामगडमंदीर हे एका उंच पहाडीवर स्थित आहे. ही पहाडी जंगल परीसरामध्ये असुन या पहाडीवर म्हणजेच श्रीरामगडमंदीराकडे एकुण चार मार्ग गेलेले आहेत.

त्यामध्ये दोन पायऱ्यांचे तर दोन रस्त्यांचे. पैकी रस्तामार्गाने रहदारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये मॉर्नींग व इव्हीनिंग वॉक करणारे व तसेच गडमंदीर परिसरात छोटी मोठी दुकाने असणाऱ्या नागरीकांचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या कित्येक महीण्यांपासुन येथील बर्वे शाळेपासुन गडमंदीराकडे गेलेल्या रस्तामार्गावरील पथदिवे बंद असल्याने नागरीकांपुढे मोठे संकट निर्माण झालेले आहे. पहाटे पाच ते साडेपाच व सायंकाळी साडेसहा नंतर या रस्त्यावर मोठा काळोख होत असतो.

त्यामुळे ज्यांच्याजवळ मोबाईल टॉर्चसारख्या उजेडाच्या साधनाची व्यवस्था नसते त्यांना यावेळी रस्ता व त्यावरील जिवजंतु दिसेनासे होत असतात. भरीस भर म्हणजे हे रस्ते जंगली भागातुन गेलेले असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांचीही मोठी भिती नागरीकांना असते.

पुष्कळदा नागरीकांनी या मार्गावरती वाघ तथा इतर वन्यप्राण्यांना आवागमण करतांना पाहिलेले आहे. तेव्हा अंधारातुन रस्ता पार करतांना नागरीकांच्या जिवात जिव नसतो. तेव्हा सदर रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी नागरीकांकडुन होत आहे.

सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, या रस्त्याचे नुकतेच सिमेंटीकरण करण्यात आले. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात आले. यानंतर रस्त्याच्या साईडींग भरण्यासाठी बाजुलाच नाली खोदत असतांना पथदिव्यांच्या केबल लाईन जागोजागी क्षतीग्रस्त ( तुटल्या )झाल्या. त्यामुळे या रस्त्यावरील संपुर्ण पथदिवे बंद पडलेले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांकडुन तपासणी, लवकरच पथदिवे सुरु होणार – दिलीप देशमुख नगराध्यक्ष
या समस्येबाबद नगराध्यक्ष दिलीप देशमुख व मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांना विचारणा केली असता काल दि. ९ मार्चला मुख्याधिकारी व न.प. प्रशाषणाची चमु पथदिव्यांच्या स्थळावर गेले होते.

तिथे त्यांनी पहाणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या सर्व प्रकाराबाबद जाब विचारत ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सांगीतले. आता लवकरच ही समस्या मार्गी लागुन पथदिवे पुर्ववत सुरु होणार असल्याचे त्यांनी माहिती देतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here