पातूर तहसील मध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्रावर नागरिकांजवळून जास्त पैश्याची मागणी…

भाजयुमो ची कारवाई ची मागणी…

पातूर – निशांत गवई

स्थानिक तहसील कार्यालय येथे निवडणूक विभागाच्या कार्यालयामध्ये 12/8/20 पासून आधार नोंदणी सुरु आहे.शासकीय निर्णयानुसार आधार किट शासकीय असल्यास नवीन आधार कार्ड काढण्यासाठी 50 रु व इतर सर्व आधार अपडेट साठी 50 रु शुल्क आकारण्यात येते परंतु तहसील ऑफिस मध्ये सुरु असलेल्या आधार नोंदणी केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासाठी व अपडेट करण्यासाठी नागरीकांजवळून 100 रु शुल्क आकारल्या जात असल्याची गंभीर बाब भारतीय जनता पार्टि युवा मोर्च्या च्या पदाधिकार्यांचा निर्दशनास आली आहे.

तसेच या प्रकारची संपूर्ण मोबाईल मध्ये व्हिडीओ क्लिप भाजयुमो पदाधिकारी यांच्या कडे आहे.तसेच तालुक्याच्या ठिकाणी पण ज्या आधार नोंदणी केंद्र सुरू केल्या जात आहेत ते नियमानुसार शासकीय जागेत पाहिजे असताना ते केंद्र हे खाजगी जागेत चालवून तिथे पण नागरिकांची एक प्रकारे लूट सुरु आहे.

तसेच या प्रकाराची माहिती तहसीलदार यांना दिली असता त्यानी चौकशी करून तुम्हाला सांगतो असे सांगितले तसेच भाजयुमो चे शहर अध्यक्ष सचिन बारोकार यांनी आधार जिल्हा समनव्यक श्री मुजुमदार याना फोन करून हि शासनाचे दर पत्रक मागितले त्या नुसार दरपत्रकावर स्पष्ट शब्दात टेबल क्र 1 मध्ये आधार किट हि अशासकीय म्हणजे पोस्ट ऑफिस,बँक या ठिकाणी असेल तर आधार नोंदणी व अपडेट शुल्क 100 रु आहे.

व टेबल नं 2 मध्ये आधार किट शासकीय असेल तर आधार नोंदणी, सर्व प्रकारचे अपडेट 50 रु शुल्क आकारण्यात यावे असे लिहले असताना सुद्धा पातूर तहसील मध्ये नागरिकांजवळून जास्त शुल्क आकारून आधीच कोरोना लॉक डाऊन मध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेल्या नागरिकांना आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रकार घडत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तसेच या जास्ती च्या शुल्क आकारणी मध्ये तहसील कार्यालयाचे काही अधिकारी सुद्धा सामील असल्याचे निवेदनात म्हटले आहे कारण सचिन बारोकार यांनी डी 21/8/20 रोजी माहिती अधिकार अंतर्गत तहसील कार्यालयाला आधार दर पत्रक व ज्या निवडणूक कार्यालय येथे आधार नोंदणी सुरु आहे.

त्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग मागितली त्याच दिवशी आधार नोंदणी केंद्र हे त्या खोली मधून हलवून ज्या खोली मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाही आहेत त्या खोली मध्ये नोंदणी सुरु केली हि बाब संशय निर्माण करणारी आहे.

तसेच आधार नोंदणी केंद्र चालक हा जुन्या अपडेट डाटा चा आधार घेत पावती वरील छापील दर दाखवून शासनाची व तहसीलदार यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.

तसेच संबधित आधार नोंदणी केंद्र चालकांवर कारवाई करून त्याचे लायसन्स रद्द न केल्यास व नागरिकांचे जास्तीचे पैसे परत न दिल्यास ह्या प्रकरनाची तक्रार जिल्हाधिकारी याना सुद्धा देऊन या गैरप्रकार मध्ये आणखी कोणत्या अधिकारी आहेत त्याचा भांडफोड करण्यात येणार आहे.

या वेळी निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन बारोकार, आशुतोष सपकाळ,भारत फुलारी,दिनेश करपे,निरज कुटे,नितीन खंडारे,निलेश फुलारी व भाजप युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेचे घामाचे पैसे परत देऊन आधार केंद्र चालकांवर कारवाई करण्यात यावी- शासकीय नियम डावलून तहसील कार्यालयमधील आधार नोंदणी केंद्र चालक मनमानी स्वरूपात जनतेजवळून जास्तीचे पैसे घेत असल्यामुळे जनतेच्या घामाचे पैसे परत द्यावे तसेच या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या तहसील कार्यालयातील दलाल व संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी (सचिन बारोकार ,)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here