लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीला तिसर्‍यांदा पुराचा तडाखा; शेकडो हेक्टरातील शेती पिक नष्ट…

सरसकट पिक विमा लागू करण्याची मागणी.

साकोली वडसा राज्य मार्गावरील वाहतूक बंद.

लाखांदूर – नास्तिक लांडगे

लाखांदूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन धरणाचे पाणी नद्यांना सोडण्यात आल्याने लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीला तिसऱ्यांदा पुराचा जबर तडाखा बसला आहे. या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील नदीला मिळणाऱ्या ओढ्यांना पूर येऊन साकोली वडसा या राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद पडली असून शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पीक पूर्णतः नष्ट झाले आहे.

सदर शेती पीक नष्ट झाल्याने पुराने बाधित शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा लागू करण्याची मागणी लावून धरली आहे. गत दोन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती.

त्यानुसार तालुक्यात केवळ 47 मिमी. पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र जिल्ह्यात अन्यत्र अतिवृष्टी होताना तालुक्यातील वैनगंगा नदीला गोसे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने चुलबंद नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह मंदावून या नदीच्या काठावरील धाना सह अन्य पीक शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे.

यापूर्वी देखील तालुक्यातील चुलबंद नदीला दोनदा पूर आल्याने यापूर्वी संपूर्ण पीक शेती ती खरडून निघाली असताना तिसऱ्यांदा आलेल्या पुराने पूर्णतः नष्ट झाल्याचे वास्तव अनेकांनी बोलून दाखविले.

दरम्यान चुलबंद नदीला आलेल्या पुराने साकोली वडसा या राज्य मार्गावरील ओढयांवरील पुलांवर पाणी आल्याने या मार्गा वरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. तालुक्‍यात तिसऱ्यांदा पूर आल्याने शेतात पिकांची हानी होताना पुराने जीवित हानी अथवा अपघात टाळण्याहेतू लाखांदूर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असताना तालुका प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here