सावित्रीबाई फुले नगरात राजर्षी छत्रपती शाहू नावाने चौकाचे नामकरण…

नागपूर – शरद नागदेवे

आरक्षण प्रणालीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू यांच्या 147 व्या जयंती निमित्ताने दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने एका चौकाच्या नामकरणाचा सोहळा बसपाचे प्रदेश महासचिव नागोरावजी जयकर, प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे व नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला

याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहूंच्या जन्म दिनाची आठवण म्हणून बसपा नेत्यांच्याच हस्ते राजर्षी छत्रपती शाहू चौकात बोधीवृक्ष रोपणाचा कार्यक्रमही पार पडला.

याप्रसंगी नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या वर्षाताई वाघमारे, जिल्हा सचिव संजय सोमकुवर, महिपाल सांगोळे, शंकर थुल, विधानसभा अध्यक्ष नितीन वंजारी, उपाध्यक्ष निरंजन जांभुळे, अमन गवळी, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सुमित जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक प्रीतम खडतकर यांनी, सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले नगर सेक्टर चे अध्यक्ष रवी पाटील यांनी तर विधानसभेचे महासचिव धनराज हाडके यांनी समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here