अकोल्याच्या ‘या’ पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची चित्रा वाघ यांची मागणी…

न्यूज डेस्क – अकोला पोलिसांच्या विशेष पथकानं एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर धाड टाकली होतीय. यात ताब्यात घेतलेल्या तीन मुलींपैकी एकीला पोलिसांनी वयाची कोणतीही शहानिशा न करता सोडून दिलं होतंय. याच मुलीवर यानंतर मागच्या महिनाभरात तिच्या एका मित्राच्या सहायाने सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. अकोला पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि असंवेदनशीलतेमूळेच ही मुलगी अत्याचाराला बळी पडल्याचा आरोप भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. त्यांनी यासंदर्भात दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केलीये.

अकोला पोलिसांचा बेताल अन असंवेदनशील कारभार एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर उठलाये. 17 जुन रोजी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकानं शहरातील मलकापूर भागातल्या ‘साई अपार्टमेंट’मधील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटवर कारवाई केली होतीय. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली होतीय. यात तीन मुलींसह काही ग्राहक पोलिसांनी ताब्यात घेतले होतेय.

ताब्यात घेतलेल्या एका मुलीने आपण 19 वर्षाचे सांगितले होतेय. पोलिसांनी तिच्या वयाची कोणतीही शहानिशा न करता तिला समज देऊन सोडून दिले होतेय. या घटनेनंतर एककेलेयेत मोठी खळबळजनक माहिती आता समोर आलीये. ही मुलगी अल्पवयीन असून तिचं वय सोळा वर्षांचं असल्याचं समोर आलंय. तिच्यावर धाडीच्या आधी अन नंतरही अमानवी लैंगिक अत्याचार करण्यात आलेय. आता या प्रकरणी भाजपच्या चित्र वाघ यांनी सरकार कडे अश्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here