डेस्क न्युज – “मम्मी तू शांत बस बरं… इथं परिस्थीती काये!”, “काय केलतं त्या पबजीने! उगाच बॅन केलं” असं म्हणत टाहो फो़डणारा तो चिमुरडा तुम्हाला आठवतं असेल. पण आता त्याचा पबजीचा नाद सुटलाय आणि त्याची जागा “लुमा गेम्स”ने घेतलीय. पबजीने अनेकांना वेड लावलं होतं.
अनेक लहान मुलं या गेमच्या आहारी गेले होते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर तर होतचं होता पण त्यांच्या स्वास्थ्यावरही होत. लॉकडाऊनमुळेतर मुलांचं मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. पण काही भारतीय तरुणांनी अशा गेम्सवर रामबाण उपाय काढलाय.
ज्यामुळे मुलांचं भरपूर मनोरंन तर होईलच त्याच बरोबर त्यांची शैक्षणीक प्रगतीही होईल. साजीद चौगुले आणि त्याच्या टीमने प्रथमिक अभ्यासक्रमाचं रुपांतर अशा काही भन्नाट गेम्समध्ये केलं आहे ज्यामुळे तुमच्या मुलांचा अभ्यासही होईल आणि मुलंही ते गेम्स आवडीनं खेळतील. त्यांमुळे अभ्यास कर रे.. चा भुंगा आता मुलांच्या मागे लावायची गरजपण पडणार नाही.
त्याबरोबर यात असेही अनेक गेम्स आहेत ज्यात मुलांसोबत पालकही सहभाग होऊ शकतात जेणे करुन पालकांना ही मुलाच्या आकलनाचा, अभ्यासातल्या प्रगतीची जवळून अनुभवता येईल. हे गेम्स सध्या ‘LUMA WORLD’ नावाने अमेझॉनवरही उपलब्ध आहेत. त्याच बरोबर www.lumaworld.in या वेबसाईटवरुनही हे गेम्स खरेदी करता येतील.