लातूर येथील पी.एस.जी.इंटरनॅशनल स्कुल च्या चिमुकली विद्यार्थिनीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद…

लातूर – विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी PSG INTERNATIONAL SCHOOL कायमच प्रयत्नशील असते. ह्यासाठीच स्कूल मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत असते.

तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत 150 पेक्षा जास्त Montessori Teaching Methodology वर आधारीत Equipment आहेत. याचेच फलित म्हणून दि. 15.02.2022 आमच्या शाळेतील UKG ची विद्यार्थिनी कृष्णवी नागुरे हिला बहुभाषिक आणि बहु-प्रतिभावान असल्याबद्दल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसाठी मान्यता आणि कौतुक मिळाले. तिने 55 सेकंदात 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःची ओळख करून दिली.

27 हाताच्या मुद्रा, 10 लेग मुद्रा आणि भरतनाट्यमचे 8 ताल सादर केल्याबद्दल तिचे कौतुकही झाले. तसेच 2 मिनिटांत प्रॉप्ससह तारक मेहता का उल्टा चष्माच्या 11 पात्रांचे अनुकरण आणि राग दुर्गा आणि वेगवेगळे अलंकार वापरून गाणे सादर केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक झाले. वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी तिच्या प्रविण्याचे प्रत्येकालाच कौतुक वाटत आहे.

शाळेच्या वतीने कृष्णवी नागुरेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी PSG International School चे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन देशमुख, संचालिका डॉ. प्रणिता कुलकर्णी यांनी कृष्णवी च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल कृष्णवीचे पालक तसेच सर्व शिक्षिका गौरी देशमुख, आश्विनी देशमुख, पूजा मंदाडे, अबोली मोरे, पूनम जाधव, सोनिया पाटील व सहकारी उमेश बोराडे वर्षा धानुरे यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here