बालविकास अधिकाऱ्यासह अंगणवाडी सेविकेस लाच घेताना रंगेहाथ पकडले, अंगणवाडी मदतनीसकडून २१ हजारांची मागितली होती लाच…

वाडा – संजय लांडगे

वाडा येथील पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे व अंगणवाडी सेविका कल्पना गवळी यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून मंगळवारी (27 एप्रिल) ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पालघर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

प्रकल्प अधिकारी खोसे यांनी अंगणवाडी मदतनीस कडून नोकरीत कायम करण्याकरिता 21 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी मदतनीस यांनी केलेल्या तक्रारीवरून लाच घेताना दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यांच्यातील आरोपी गोरक्ष खोसे हे वाडा पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. तर दुसरी आरोपी कल्पना गवळी या खोसे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डाहे लोखंडे पाडा येथील अंगणवाडी सेविका आहेत. याच अंगणवाडीत कार्यरत असणाऱ्या मदतनीस यांना कायम करण्यासाठी प्रकल्प अधिकारी खोसे यांनी 21 हजाराची मागणी केली होती.

ही रक्कम कल्पना गवळी यांच्याकडे द्यावी असे ठरले होते. मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास ठरलेल्या रक्कमे पैकी 15 हजाराची लाच घेतांना प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे व अंगणवाडी सेविका कल्पना गवळी यांना अटक करण्यात आली आहे.लाच लूचपत प्रतिबंधक पालघर युनिटचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here