वाळकीच्या तरुणाचा कोगनोळी येथे अपघातात मृत्यू…

राहुल मेस्त्री

वाळकी तालुका निपाणी येथील तरुणाचा कोगनोळी तालुका निपाणी येथील पुणे-बंगलोर महामार्ग या ठिकाणी दिनांक आठ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान येथील शेतकरी पंपा नजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विनायक कृष्णात पाटील वय वर्षे 31 राहणार वाळकी तालुका निपाणी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विनायक कृष्णात पाटील आणि शरद कृष्णात पाटील हे,

दोघे भाऊ कामाची सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून एम आय डीसी मधून वाळकी कडे जात असताना येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शेतकरी पेट्रोल पंपा नजीक आले असता दुचाकीवरचा ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजकावर दुचाकी आदळल्याने यामध्ये विनायक पाटील यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याचा भाऊ शरद पाटील हा किरकोळ जखमी झाला होता.घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कोगनोळी आऊट पोस्टचे ए एस आय एस ए टोलगी, कोगनोळी बीट हवलदार राजू खानपन्नावर, अमर चंदनशिव यांनी भेट देऊन पाहणी केली.सदर अपघातातील मृत व्यक्तीचे शवविच्छेदन निपाणी येथील शासकीय इस्पितळात करून मृतदेह कुटुंबीयांच्या त्याबाबत देण्यात आला. व जखमी व्यक्तीवर याच इस्पितळात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here