चिखलदरा | अकोल्यातील दोन युवकांचा डोहात बुडून मृत्यू !…


अमरावती – गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत सुट्या असल्याने चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. काल अकोला येथील दोन युवकांचा युवकांचा जत्राच्या डोहात बुडून मृत्यू झाला 15 ऑगस्ट रविवारी दुपारी ही घटना घडली. दोघांचे मृतदेह डोहाबाहेर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.

मृत्यू झालेल्या युवकांचे नाव शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) रा.अकोट फैल अकोला अशी असून ते दोघेही आपल्या एकूण ९ मित्रांसह अकोला येथून १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. युवक बुडाल्याचे माहिती मिळताच चिखलदरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हे दोघं आपल्या 9 मित्रांसह चिखलदरा येथे फिरण्यासाठी आले होते. चिखलदरा येथे त्यांनी वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यानंतर ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील (Melghat Tiger Project) मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या जत्राडोह पाईंट येथे आले. जत्राडोह पाईंट येथे कोसळणाऱ्या धबधब्याखाली जाण्यास सक्त मनाई असताना सुध्दा ते याठिकाणी गेले. याठिकाणी आंघोळ करत असताना दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते खोल पाण्यामध्ये बुडाले.

खोल पाण्यात उतले यादरम्यान दोघे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट,रितेश देशमुख सहकारी करीत आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here