माय मरो आणि मातृत्व जगो हे आमचे हिंदुत्व नव्हे…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

न्यूज डेस्क – राज्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीच्या दिवशी शिवसेना मेळाव्यात भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. गाय मरो आणि माय जगो असे आमचे हिंदुत्व नाही. गाय म्हणजे माता आणि तिथे जाऊन खाता.या मेळाव्यात ते बोलत होते.

यंदा करोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा हा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. गेल्या अनेक महिन्यातील खदखद व्यक्त करीत असल्याची भावना त्यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणापत्रात मोफत कोरोना लस दिली जाणार असल्याचे जाहीर केले होते.

यानंतर भाजपवर टीका केली जात होती. त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी यावर राग व्यक्त केला. केवळ बिहारमध्येच मोफत लस का? मग उरलेला देश पाकिस्तान आहे की बांग्लादेश. अशी वागणूक का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

“हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून…पण आम्हाला कोण विचारतंय…ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या.

संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here