मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाहिली आदरांजली…

न्यूज डेस्क – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी सहपरिवार शिवतीर्थ स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

यावेळी त्यांच्या पत्नी सौ. रश्मीताई ठाकरे, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सह शिवतीर्थ येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन केले.

कोरोनाची परिस्थितीमुळे शिवसैनिकांना शिवतीर्थावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून बाळासाहेबांना अभिवादन करावे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं.यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here