राज्यात लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत…

न्यूज डेस्क – राज्यात वाढत्या कोरोनाचे प्रकरण लक्ष्यात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवस पूर्ण लॉक-डाउन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सर्व पक्षांशी बैठक घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात दररोज सुमारे ५९-६० हजार कोरोनाची प्रकरणे नोंदविली जात आहेत.

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे. कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे. आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत.

मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो तेथेही परिस्थिती गंभीर आहे. गेल्या वेळी आपण रेल्वे बसेस बंद केल्या होत्या. फेब्रवारीपर्यंत इतर राज्यांचं आणि आपलं चित्र सारखं होतं पण विदर्भात चित्र बदलू लागलं. तेथे जो व्हायरसचा स्ट्रेन आढळला त्यामुळे तीव्रता वाढली. या नव्या स्ट्रेनची माहिती आपल्याला आधीच मिळाली असती तर तेव्हाच परीस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले असते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here