छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…

रामटेक – राजु कापसे

राष्ट्रीय ओबीसी संघ द्वारे राष्ट्रीय आदर्श विद्यालय, रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। सामाजिक परिवर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा मधे प्रतेकी 18 विद्यार्थी यानी भाग घेतला.

ऋतुजा नांगुलवार, उत्कर्ष कावळे, प्रशिका डोंगरे, रोशन टेटवार, समीर वाहने, रिद्धि आस्टनकर, अंजली दमाहे, निधि ठाकरे यानी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला। याना 3600 रूपयांचे रोख पुरस्कार देण्यात आले.

प्रमुख वक्ते व कवि श्रीराम आस्टनकर प्रबोधन पर म्हणाले की सामाजिक परिवर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान अतुलनीय आहे। त्यानी अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातिवाद, अस्पृश्यता, याना थारा दिला नाही.

शेतकऱ्यासाठी व जनतेकरिता अनेक लोकोपयोगी कार्य केले. म्हणूनच जनता त्यांना आपला राजा मानीत होते. युवक युवतिनि महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक परिवर्तनसाठी कार्य करावे.

डाॅ. ओमप्रकाश आष्टनकर यांनी प्रास्ताविक भाषणात शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्याची कारणे व शिवरायांचं सामाजिक परिवर्तनातील योगदान या विषयावर संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी करिता सुधाकर मोहोड़, तुलाराम मेंढे, देवीदास कुथे, रमेश कारामोरे, भालचंद्र भड़के , मनोहर भगत, अन्ना हीरोळे,, डॉ. राजेश ठाकरे, डॉ. ओम आस्टनकर, नाना भाऊ उराडे, योगिता गायकवाड़, शांतनु भड़के सहित आदिनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here