ज्‍यूनियर नॅशनल वेटलिफ्टींग स्‍पर्धेमध्‍ये प्रतिक्षाने रौप्‍य पदक प्राप्‍त केल्‍याबद्दल माजी गटनेता चेतन पवार यांनी केला सत्‍कार…

अमरावती – भुवनेश्‍वर येथे नुकतेच संपन्‍न झालेल्‍या ज्‍यूनियर नॅशनल वेटलिफ्टींग स्‍पर्धेमध्‍ये क्रीडा प्रबोधिनी पुणे ची खेळाडू कु.प्रतिक्षा राजेश कडू हिने ७६ किलो वजनी गटात १७२ किलो वजन उचलुन रौप्‍य पदक पटकाविले आहे. कु.प्रतिक्षा कडू ही क्रिडा प्रबोधिनी पुणे येथे उज्वला माने यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच वर्षापासून सराव करत आहे व एन्द्रयनी कॉलेज तळेगाव (दाभाडे) पुणे येथे शिक्षण घेत असून स्‍थानिक राजापेठ येथील रहिवासी आहे.

भुवनेश्वर येथे २१ ते २८ एप्रिलला झालेल्या फेडरेशन नॅशनलमध्‍ये १७२ किलो वजन उचलून रौप्‍य पदक प्राप्‍त केले आहे. शहरातील सर्व स्‍तरातुन कु.प्रतिक्षा कडू वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने आपल्‍या यशाचे श्रेय आई-वडील व कोच तसेच परिवारातील सर्व सदस्‍यांना देत आहे.

कु.प्रतिक्षा राजेश कडू या विद्यार्थीनीने रौप्‍य पदक प्राप्‍त केल्‍याबद्दल तिचा सत्‍कार माजी गटनेता चेतन पवार यांनी केला व तिला पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या. याप्रसंगी बाळासाहेब होले, सौ.जयाताई अळसपुरे, सौ.वर्षाताई कडू, दिपक इंगळे, राधीका कडू उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here