कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी…

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री …
2020 साल हे कोरोनाव्हायरसमुळे चर्चेत आले होते. मात्र 2021 साल देखील असेच कोरोनामुळे चर्चेत येणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण देशात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे बोलले जाते .तर शेजारच्याच महाराष्ट्र राज्यात दररोज हजारो कोरोना बाधित सापडत असल्याचा आकडा समोर येत आहे.

यासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाका येथे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निपाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कँनिंग द्वारे तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणी केंद्रामध्ये स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी ,आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका आणि अशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत तपासणी करण्यात येत आहे. जर कोणत्याही प्रवाशाला सर्दी ,खोकला ,ताप यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी माहिती निपाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.

यामुळे पुन्हा लाँकडाऊन होणार का असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला आहे.यावेळी निपाणी सर्कल अधिकारी अजित वंजोळे, बेडकिहाळ सर्कल अधिकारी संजय नेमन्नावर, तलाठी शिरीष पोवार, तलाठी के एल पुजारी, कोगनोळी ग्राम विकास अधिकारी डी बी जाधव, निपाणी तालुका ग्रामसहाय्यक एम ए मुल्ला, उमेश कोळी, एल बी पुजारी, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सलीम मुजावर, आशा कार्यकर्त्या, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आर बी पिंपळे, एम डी युसुफखान, आरोग्य सेविका ए एस मधाळे आदिसह कोगनोळी टोल नाक्यावर तैनात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here