सांगोळा येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित…

चढ्या दराने धान्याची विक्री करणे भोवले, पातुरचे तहसीलदारांची कारवाई

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील सांगोळा येथे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी १५ नोव्हेंबर रोजी केली आहे. स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करून खेट्री येथील स्वस्त धान्य दुकानाशी जोडण्यात आला आहे.

सांगोळा येथील स्वस्त धान्य दुकानदार सौ. गोदावरी म. पोरे , हे धान्य दुकानातून धान्याची चढ्या दराने विक्री करून ग्राहकांकडून शासनाच्या नियमानुसार किंमत वसूल न करता जास्त भावाने विक्री करीत असल्याचे व पावती देत नसल्याचा प्रकार सुरू असल्याबाबतची तक्रार सांगोळा येथील संदीप रामदास दांदळे यांनी पातूरच्या तहसीलदारांकडे केली होती.

त्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाने सांगोळा येथील स्वस्त धान्य दुकानदार चढ्या दराने विक्री करीत असल्याबाबतच्या तक्रारीवरून तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या होत्या. तसा अहवाल पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केला होता.त्या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी बी यु काळे यांनी परवाना निलंबित केला आहे.रेशन दुकानदारासह अनेक कार्डधारकांचे जबाब नोंदविण्यात आले होते.

गोरगरीब नागरिकांना धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना धान्याचा पुरवठा केला जातो, परंतु सांगोळा येथील धान्य दुकानदार नियमानुसार धन्याचा वाटप न करता, पावती देत नाही, भाव फलक लावलेले नाही, चढ्या दराने धान्याची विक्री,असे आरोप सांगोळा येथील संदीप रामदास दांदळे यांनी पातुरचे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केला होता.

सदर तक्रारीची दखल घेत बाळापूरच्या निरीक्षण पुरवठा अधिकारी अर्चना भगत व पातूरचे पुरवठा निरीक्षक विनीत ताले यांनी सांगोळा येथे स्वस्त धान्य दुकानदारसह अनेक कार्डधारकांचे जबाब नोंदविले होते. चौकशी दरम्यान, अनेक त्रुटी आढळून आल्याचे धान्य दुकानदार सौ. गोदावरी म.पोरे यांचा धान्य दुकानाचा परवाना १५ नोव्हेंबर रोजी निलंबित केल्याची कारवाई तहसीलदार दीपक बाजड यांनी केली आहे.

तसेच अनामत रक्कम शासन जमा केली असून, कार्डधारक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून खेट्री येथील धान्य दुकानदार हबीब खान यांना सांगोळा येथील कार्डधारक जोडून दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here