चासकमान धरण तुडूंब;धरणातून २५० क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले…

चाकण ( पुणे ) : जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे ९९ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. चासकमान डावा कालव्यात २५० क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

भिमाशंकर परिसरात पडत असलेल्या दमदार पावसाने चासकमान धरण तुडुंब भरले आहे. धरणात ९९ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढल्यास धरणाच्या सांडव्यावरून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग केव्हाही सोडण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी व भीमा नदी पात्रात कोणीही जाऊ नये,असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here