चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असणार…राहुल गांधींची घोषणा

सौजन्य - ANI

न्युज डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी लुधियाना येथे एका सभेत पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असतील.

राहुल म्हणाले की, हा माझा नाही तर पंजाबच्या जनतेचा निर्णय आहे. राहुल गांधी म्हणाले, “चन्नी जी गरीब घरातील मुलगा आहेत. त्यांना गरीबी समजते. ते गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांच्या हृदयात त्यांच्या रक्तात पंजाब आहे. सिद्धूजींच्या हृदयात त्यांच्या रक्तात पंजाब आहे. रक्त बाहेर येईल आणि त्यात पंजाब दिसेल.

तत्पूर्वी रविवारी, राहुल गांधी यांनी सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी, पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू, माजी पीपीसीसी प्रमुख सुनील जाखर आणि एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याशी हयात रीजन्सी, लुधियाना येथे बंद दाराआड बैठक घेतली. 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

त्याचवेळी लुधियानामधील व्हर्च्युअल रॅलीदरम्यान पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, “मला राहुल गांधींचा निर्णय मान्य आहे.. मला निर्णय घेण्याची शक्ती दिली तर मी लोकांच्या जीवनातील माफिया नष्ट करेन. “मी सुधारणा करेन. सत्ता दिली नाही तर तुम्ही ज्याला मुख्यमंत्री कराल, मी हसत हसत चालेन.

बहुप्रतिक्षित घोषणेपूर्वी, राहुल गांधी आणि दोन प्रमुख दावेदार – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसचे राज्य युनिट प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू हे देखील एकाच कारमधून प्रवास करताना दिसले. काँग्रेस नेते सुनील कुमार जाखड यांनीही या तिघांसोबत राईड शेअर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here