कोरोना महामारीमुळे चार धाम यात्रा रद्द…उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय…

न्यूज डेस्क – देशात कोरोना महामारीची दुसरी लाट जास्तच धोकादायक असल्याने देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत आहे. या साथीच्या रोगाला रोखण्यासाठी लॉकडाउन व रात्रीचे कर्फ्यू देशभरातील अनेक राज्यातही लागू आहे. यासह आता ही महामारी थांबविण्यासाठी उत्तराखंड सरकारने यंदा होणारी चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार चार धाम यात्रा रद्द करण्यात आली आहे आणि केवळ बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथील मंदिरातील पुजार्‍यांना अनुष्ठान व पूजा करण्याची परवानगी दिली जाईल. केवळ पुजार्‍यांनाच पूजा आणि इतर धार्मिक विधी करण्याची परवानगी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here