सुकळी येथे खून आरोपी चान्नी पोलिसांच्या ताब्यात…

पातूर – चान्नी पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या ग्राम सुकळी येथे शाब्दिक बाचाबाची वरून एकाचा खून झाल्याचि घटना 13 सप्टेंबर च्या सायंकाळी 5वाजता च्या दरम्यान घडली सविस्तर वृत्त असे कि सुकळी येथिल विकास बाबुसिग राठोड व रामदास तुकाराम हिवराळे हे दोघे सस्ती येथील गोपाल घोगरे यांच्या शेतात मोलमजुरी करत असतात आज सायंकाळी मजुरी केल्यानंतर दोघांनि दारू प्राशन केली.

या दरम्यान दोघात शाब्दिक बाचाबाची झाली असता विकास राठोड याने कुऱ्हाड्डी ने रामदास हिवराळे याच्या वर वार केले असता रामदास हिवराळे हा गंभीर जखमी झाला त्यांना उपचारासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाला घटनेचि माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी विकास राठोड यास ताब्यात घेतले वृत्त लिहेस्तोवर चान्नी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचि प्रक्रिया सुरु होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here