Chandra Grahan Date : 2023 या वर्षात मध्ये एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहेत. पहिले सूर्यग्रहण झाले आहे. हे सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले, जे भारतात दिसले नाही. आता पहिल्या सूर्यग्रहणानंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहणही होणार आहे.
हे चंद्रग्रहण 05 मे, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. चंद्रग्रहण ही भौगोलिक घटना असली तरी पौर्णिमेच्या रात्री राहू आणि केतू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्रग्रहण होते अशी पौराणिक समजूत आहे. पौराणिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या काही तास आधी, सुतक कालावधी होतो, जो ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून शुभ मानला जात नाही. अशा परिस्थितीत, चंद्रग्रहण किती काळ टिकेल आणि त्याचा सुतक कालावधी होईल की नाही हे जाणून घेऊया…
वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी होईल?
2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार 5 मे 2023 रोजी होत आहे. हे चंद्रग्रहण रात्री ८.४५ वाजता सुरू होऊन पहाटे १ वाजता संपेल.
2023 चा चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होत असला तरी वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी येथे वैध राहणार नाही.
कुठे दिसणार पहिले चंद्रग्रहण
हे छाया चंद्रग्रहण आहे. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूने पडते तेव्हा त्याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्हणतात. यामुळे हे ग्रहण सर्वत्र दिसणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागरात पाहता येणार आहे.
चंद्रग्रहण कधी होते?
पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या प्रक्रियेत एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात. या दरम्यान, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, परंतु चंद्रापर्यंत पोहोचत नाही. या घटनेला खगोलीय घटना म्हणून चंद्रग्रहण म्हणतात.