अमरावती – विदर्भात गेल्या आठवडा भरापासून उन्हाचा पारा वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सियस सर्वाधिक तापमान नोंदविल्या गेलं आहे.चंद्रपूर पाठोपाठ अकोला ४२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद आहे.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिक उकड्याने हैराण झालेत. यागामी काळात उन्हापासून दिलासा मिळणार आहे. अमरावतीच्या हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे..
जम्मू काश्मीरवर येत असलेले पश्चिमी विषभोग, राजस्थान व तामीळनाडू वर असलेले चक्राकार वारे यांच्या प्रभावामुळे ८ व ९ एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.